‘नॅशनल क्रश’ रश्मिकाचा २ मुलांच्या बापामध्ये गुंतलाय जीव, ‘या’ अभिनेत्यासह करायचं आहे लग्न?

‘नॅशनल क्रश’ नावाने प्रसिद्ध असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधाना (Rashmika Mandhana) हिचे नाव फिल्म ‘गीता गोविंदम’धील अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत जोडले जाते. रश्मिकाचे एक हास्य आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभावावर लाखो लोक फिदा असले तरी, रश्मिकाचा क्रश कोण आहे आणि ती कोणाला तिच्या स्वप्नांचा राजकुमार मानते हे तुम्हाला माहीत आहे का? रश्मिकाचे करोडो चाहते असले तरी रश्मिकाचे स्वतः तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार विजय जोसेफ (Vijay Joseph) म्हणजेच ‘थलपथी विजय’ याच्यासोबत काम करण्याचे स्वप्न आहे. रश्मिकाला विजयसोबत काम करायला खूप आवडते.

रश्मिकाच्या स्वप्नांतील राजकुमार आहे विजय
दक्षिण इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट ‘मास्टर’चा नायक विजय हा रश्मिकाचा क्रश आहे. ज्याच्यासोबत तिला तिचा ड्रीम रोल करायचा आहे. तसे, रश्मिकाने विजयसोबत काम करण्याची इच्छा एक नव्हे तर अनेक वेळा व्यक्त केली आहे. ‘भीष्म’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही रश्मिकाने हावभावात हे सांगितले होते. याशिवाय रश्मिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला तमिळ संस्कृती खूप आवडते. आणि तिला फक्त तमिळ मुलाशी लग्न करायचे आहे.

तमिळनाडूच्या संस्कृतीवर प्रभावित आहे रश्मिका
अभिनेत्री रश्मिका सांगते की, मी तामिळनाडूच्या संस्कृतीने आणि विशेषतः त्यांच्या खाद्यपदार्थांनी खूप प्रभावित आहे. मी तमिळ जेवणाच्या प्रेमात पडले आहे आणि ते खूप स्वादिष्ट असते. मला आशा आहे की मी एका तमिळीशी लग्न करून तामिळनाडूची सून बनेल. महत्त्वाचे म्हणजे जोसेफ विजय देखील एक तमिळ आहे, परंतु समस्या अशी आहे की तो आधीच विवाहित आहे आणि 2 मुलांचा बाप बनला आहे.