Rana JagjitSingh | अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी राणाजगजितसिंह यांनी उजनीतील आठवडी बाजारात काढली पदयात्रा

Rana JagjitSingh | धाराशिव लोकसभेतील (Dharashiv LokSabha) उमेदवारांच्या प्रचाराणे आता वेग घेतला आहे.  कोपरासभा, गांव भेट दौऱ्याबरोबरच अन्य मार्गांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेते प्रयत्नशील असल्याचे दिसते. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार राणाजगजितसिंह (Rana JagjitSingh) यांनी आठवडे बाजारात नागरिकांशी संवाद साधला. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. मतदारसंघात विकास कामासाठी निधीचा ओघ आणायचा असले तर, आपल्या हक्काचा खासदार निवडून द्या. मग आपल्याला कोणी रोखू शकणार नाही, असे आवाहन करत पाटील यांनी  मतदारांना विकासाची गॅरंटी दिली.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी राणाजगजितसिंह पाटील यांनी औसा तालुक्यातील उजनी येथे आठवडी बाजारात पदयात्रा काढत व्यापारी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, पदयात्रेपुर्वी त्यांनी बाणगंगा साखर कारखाना येथे भेट देऊन कर्मचारी व गावकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून आपल्या लोकसभा क्षेत्रात त्याच विचारांचा खासदार असल्यास विकासापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?