Jayant Patil | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणणाऱ्यांनी उत्पन्न निम्मे केले, जयंत पाटील यांची टीका

Jayant Patil | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणणाऱ्यांनी त्यांचे खर्च वाढवून उत्पन्न निम्मे केले. महाराष्ट्रातील कुठल्याही भाजपच्या नेत्याला फोन करून विचारा, कसा आहे यंदा? समोरून उत्तर येईल, जरा अवघडच आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य किती कष्टाने असे मिळालेल्या आहे हे तुम्ही-आम्ही जाणतो. मात्र या निवडणुकीनंतर ते स्वातंत्र्य राहील का? हा खरा प्रश्न आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

आज चोपडा येथे महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, रावेर मतदारसंघात बदल अटळ आहे. तुम्ही राम राम करता, आम्ही श्रीरामच आणलेले आहेत. तुम्ही हात दाखवा तिथे गाडी थांबवेल. तुमची सेवा करेल. सर्वात महत्वाचे म्हणजे केळी बागायतदारांच्या उन्नतीसाठी कोल्ड स्टोरेज, कोल्ड चेन निर्माण करतील. कापसाचा दर वाढवण्यासाठी दिल्लीत आवाज उठवतील. शेतकऱ्यांच्या हक्काच्या उमेदवाराला बहुमताने निवडून द्या असेही जयंत पाटील यानी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय