दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक, दारु घोटाळ्याप्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

Manish Sisodia Arrests: सीबीआयने दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात दुसऱ्या फेरीच्या चौकशीनंतर रविवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. आणि मनीष सिसोदिया यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.सीबीआय एफआयआरमधील आरोपी क्रमांक एक असलेल्या सिसोदिया यांची यापूर्वी १७ ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती.(Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia arrested, CBI action after 8 hours of interrogation in liquor scam case)

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांना रविवारी अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. मनीष सिसोदिया तपासात पूर्ण सहकार्य करतील, असे आम आदमी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. मनीष सिसोदिया तपासात सहकार्य करत नव्हते, त्यामुळे त्यांना अटक करावी लागली, असे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.