औरंगजेबाच्या कबरीवर कुत्रासुद्धा मुतणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल(शनिवार) मुंबईत बीकेसीमध्ये(BKC)  घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis, Manes President Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा पार पडली. या सभेत फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला खणखणीत प्रत्युत्तर दिले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या पलिकडे जाऊन हिंदी भाषिक संमेलनात अकबरुद्दीन ओवैसीचा समाचार घेतला. “अरे ओवैसी सुन ले तू, कुत्ता भी ना पेशाब करेगा, औरंगजेब की पहचान पर; अब तो भगवा लहरायेगा सारे हिंदुस्थान पर”, अशा कडक काव्यात्मक शब्दांमध्ये फडणवीस यांनी अकबरुद्दीन ओवैसीचा समाचार घेतला.

ज्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हालहाल करून मारले, त्याच्या कबरीवर माथा टेकवून अकबरुद्दीन ओवैसी यांनी समस्त हिंदूंचाच नव्हे, तर मुसलमानांचाही अपमान केला आहे, असे शरसंधान फडणवीस यांनी साधले.( devendra fadanvis on aurangzeb).