उष्माघात काय असतो? त्याच्यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय करावेत? जाणून घ्या सर्वकाही

देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या उन्हाने आपला जुना विक्रम मोडीत काढला आहे. उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. देशातील अनेक भागात पारा ४५ अंशांवर पोहोचला असून उष्माघातापासून (Heat Stroke) वाचण्यासाठी लोक अनेक मार्गांचा अवलंब करत आहेत. बर्‍याच लोकांना उष्माघाताची नीट माहिती नसते. त्यामुळे या लेखात आम्ही तुम्हाला उष्माघात म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि कोणते घरगुती उपाय तुम्हाला उष्माघातापासून (Sun Stroke) मुक्ती मिळवून देऊ शकतात? हे सांगणार आहोत.

उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात किंवा सन स्ट्रोक याला सामान्य भाषेत ‘लू लागणे’ म्हणतात. जेव्हा तुमचे शरीर तापमान नियंत्रित करू शकत नाही तेव्हा असे होते. जेव्हा उष्माघात होतो तेव्हा शरीराचे तापमान वेगाने वाढते आणि ते कमी करता येत नाही. जेव्हा एखाद्याला उष्माघाताचा झटका येतो तेव्हा शरीरातील घाम येण्याची यंत्रणाही बिघडते आणि त्या व्यक्तीला अजिबात घाम येत नाही. उष्माघाताच्या 10 ते 15 मिनिटांत शरीराचे तापमान 106°F किंवा त्याहून अधिक वाढू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास मानवी मृत्यू किंवा अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते.

उष्माघाताची लक्षणे (Heat Stoke Symptoms)
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार केल्यास मदत होऊ शकते. म्हणूनच उष्माघाताची सर्व लक्षणे ओळखणे आवश्यक आहे.

डोकेदुखी
स्मृतिभ्रंश
उच्च ताप
शुद्ध हरवणे
बिघडणारी मानसिक स्थिती
मळमळ आणि उलटी
त्वचा लालसरपणा
हृदयाचे ठोके वाढमे
त्वचा मऊ पडणे
कोरडी त्वचा

उष्माघाताची कारणे (Heat Stroke Reasons)
खूप उष्ण ठिकाणी दीर्घकाळ राहिल्याने सनस्ट्रोक किंवा उष्माघात होऊ शकतो. थंड वातावरणातून कोणी अचानक गरम ठिकाणी गेल्यास उष्माघाताची शक्यताही वाढते. उष्ण हवामानात जास्त व्यायाम करणे हे देखील उष्माघाताचे प्रमुख कारण आहे. उन्हाळ्यात भरपूर घाम आल्यावर पुरेसे पाणी न पिणे. जर कोणी जास्त मद्यपान केले तर शरीराचे तापमान सुधारण्याची शक्ती कमी होते. हे देखील उष्माघाताचे कारण असू शकते. उन्हाळ्यात असे कपडे घातल्यास ज्यात घाम आणि हवा जात नाही, तर उष्माघाताचा धोकाही वाढू शकतो.

उष्माघातापासून आराम मिळवण्यासाठी उपाय (Remedies to get relief from heatstroke)
जर एखाद्याला उष्माघात झाला आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास अवयव निकामी होणे, मृत्यू, ब्रेन डेड अशा काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर एखाद्याला उष्माघाताचा त्रास होत असेल तर लगेच खाली नमूद केलेल्या सुरुवातीच्या पद्धतींचा अवलंब करा.

-सनस्ट्रोक झालेल्या व्यक्तीला उन्हात बसवू नका
-कपड्यांचा जाड थर काढा आणि हवा येऊ द्या
-शरीर थंड करण्यासाठी कूलर किंवा पंख्यापुढे बसा
-थंड पाण्याने अंघोळ करा
-थंड पाण्याच्या कपड्याने शरीर पुसा
-डोक्याला बर्फाचा पॅक किंवा थंड पाण्याने ओला केलेला कपडा लावा
-थंड पाण्यात भिजवलेला टॉवेल डोके, मान, बगल आणि कंबरेवर ठेवा
-या प्राथमिक उपायांनंतरही जर शरीराचे तापमान कमी होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा

(टीप: या लेखात नमूद केलेल्या माहिती, पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.)