Pune News | पुणेकरांतर्फे ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’चे आयोजन

Pune News | पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य कसे असावे, याबद्दल चर्चा करण्यासाठी पुणे स्पोर्ट्स असोसिएशन (Pune Sports Association) आणि सर्व फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’चे (Pune Sports Conclave) आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ऑलिम्पिक मेडल पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे.

२७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणाऱ्या या कॉन्क्लेव्हला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर व क्रीडाप्रेमी टेनिसपटू आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित राहणार आहेत.

डी. पी. रोडवरील (Pune News) शुभारंभ लॉन्स येथे हे कॉन्क्लेव्ह भरणार आहे. पुण्यातील सर्व ऑलिम्पियन्स, अर्जुन पुरस्कार विजेते, छत्रपती पुरस्कार विजेते, ध्यानचंद पुरस्कार विजेते, एकलव्य पुरस्कार विजेते आणि ग्रँडमास्टर्स या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन