Ajit Pawar | ‘कार्यकर्त्यांनो कुणा एकाचं कुंकु लावा, नाहीतर गाठ माझ्याशी’, अजितदादांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी उपमुख्यमंत्री व पती अजित पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांनी पत्नी सुनेत्राच्या प्रचाराची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. दरम्यान एका सभेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दोन्ही दगडांवर पाय न ठेवण्याचा इशारा दिला आहे.

शिर्सुफळमध्ये बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, काही कार्यकर्ते माझ्या देखील सभेमध्ये येतात. मला दिसतात आणि दुसरे सभेला आले की त्यांच्याकडेही जातात. कार्यकर्त्यांनो कुणा एकाचं कुंकु लावा आणि मी ज्या कार्यकर्त्यांना पदं दिली, मानसन्मान दिला आणि जर तो कार्यकर्ता चुकला तर अजित पवार यांच्याशी गाठ आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांना सज्जड दमदेखील दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा