पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात अर्थसंकल्पाचं लोकशाहीकरण केलं -फडणवीस

Mumbai – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या आठ वर्षात अर्थसंकल्पाचं लोकशाहीकरण केलं आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना निधी मिळाला असून अजून पूर्ण तरतुदी कळलेल्या नाहीत. ही यादी आणखी वाढेल असं त्यांनी काल मुंबईत बोलताना सांगितलं.

प्राथमिक माहितीनुसार ,विदर्भ-मराठवाडा सिंचनासाठी 400 कोटी, रस्ते सुधारणांसाठी एक हजार कोटी, पर्यावरणपूरक पोक्रा प्रकल्पासाठी 600 कोटी, पुणे मेट्रोसाठी 1 हजार 206 कोटी, मुळा मुठा नदी शुद्धीकरणासाठी 246 कोटी, बुलेट ट्रेनसाठी दोन हजार कोटी, मुंबई मेट्रोसाठी 500 कोटी, मुंबईच्या एमयुटीपीसाठी 163 कोटी, ग्रीन मोबीलिटी 215 कोटी, नागपूर मेट्रो 118 कोटी, नागनदी शुद्धीकरणासाठी 224 कोटींची घोषणा करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. साखर उद्योगाला यातून काय लाभ होणार आहे, याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.