सत्यजित तांबेंना पाठींबा देऊ नका; त्यांना भाजपमध्ये प्रवेशही देऊ नका; मातब्बर नेत्याचा तांबेंना विरोध

Pune – कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा नेता सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागली आहे.

सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे, वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म आलेला असतांना निवडणुकीतून माघार घेणे, आणि भाजपनेही उमेदवार न देणे ही फडणवीस यांची राजकीय खेळी असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (State Vice President of BJP Sanjay Kakade) यांनी मात्र सत्यजित तांबे यांच्या सत्यजित तांबे यांना भाजपनं पाठिंबा देऊ नये, असं म्हणत विरोध दर्शविला आहे.

TV9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, संजय काकडे यांनी सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये या मागणीसह त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेली वक्तव्य आणि आंदोलनं आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांनी केलेली आंदोलने आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटो फासलेली काळे भाजप कधीही विसरणार नाही त्यामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये अशी मागणी त्यांनी भाजपकडे केली आहे.ंं