गृहिणींनो चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका ‘या’ भाज्या, होऊ शकते विषबाधा

अनेकदा लोक भाज्या किंवा फळे ताजे ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर करतात. ज्यांना रोज भाज्या आणि फळे आणायला वेळ मिळत नाही, ते एकदाच भरपूर भाज्या व फळे फ्रीजमध्ये आणून ठेवतात. फ्रीजमध्ये या गोष्टी जास्त काळ ताज्या राहू शकतात. पण काही फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे, असेही तज्ज्ञ सांगतात. जर त्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या, तर त्या विषबाधाचे कारण बनू शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्या भाज्यांबद्दल, ज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत. (Vegetables Not to Store In Fridge)

1. काकडी
काकडी (Cucumber) ही सामान्यतः भाजी मानली जाते. कृषी आणि पर्यावरण विज्ञान महाविद्यालयाच्या मते, जर काकड्यांना तीन दिवसांपेक्षा जास्त काळ 10 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवले तर ते वेगाने सडण्यास सुरवात होते. म्हणूनच काकडी फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. काकडी फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी थेट सूर्यप्रकाशापासून दूर असलेल्या सामान्य ठिकाणी ठेवा. तज्ज्ञांच्या मते, काकडी एवोकॅडो, टोमॅटो किंवा खरबूज यांसारख्या फळांजवळ ठेवू नये. कारण अशी फळे पिकल्यावर इथिलीन वायू सोडतात आणि त्या वायूच्या संपर्कात आल्याने काकडी लवकर पिवळी पडू शकतात. हा वायू हानिकारक नसला तरी फळे किंवा भाज्यांना लवकर पिकवतो.

2. टोमॅटो
तज्ञांच्या मते, टोमॅटो (Tomato) देखील नेहमी खोलीच्या तापमानात साठवले पाहिजेत. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने चव, पोत आणि सुगंध यावर परिणाम होतो, त्यामुळे टोमॅटो सूर्यप्रकाशापासून दूर थंड आणि अंधार असलेल्या ठिकाणी ठेवावे. खिडकीतून येणारे गरम किरण टोमॅटो पिकवण्याच्या प्रक्रियेला गती देतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या टोमॅटोपेक्षा फ्रीजच्या बाहेर ठेवलेले टोमॅटो आठवडाभर जास्त टिकण्याची शक्यता असते.

3. कांदा
नॅशनल ओनियन असोसिएशन (NOA) नुसार, कांदे (Onion) थंड, कोरड्या, गडद आणि हवेशीर खोलीत साठवले पाहिजेत. कारण कांदे ओलावा सहज शोषून घेतात. तापमान किंवा आर्द्रता जास्त असल्यास कांद्याला अंकुर फुटू लागतात किंवा कांदे कुजण्यास सुरुवात होऊ शकते. थंड खोलीच्या तापमानात ठेवल्यास कांदे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकतात.

4. बटाटा
कच्चे बटाटे (Potato) टोपलीत उघड्यावर ठेवणे चांगले मानले जाते. बटाटे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. थंड तापमान कच्च्या बटाट्यामध्ये आढळणाऱ्या पिष्टमय कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये बदल घडवून आणते आणि बटाटा शिजवल्यावर त्याची चव अधिक गोड लागते. म्हणूनच त्यांना फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. होय, भाज्या बनवल्यानंतर, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्या फ्रीजमध्ये ठेवू शकता.

5. लसूण
लसूणही (Garlic) फ्रीजमध्ये ठेवू नये. कारण ते देखील ओलावा फार लवकर शोषून घेतात. म्हणूनच कांद्यासारख्या थंड, कोरड्या जागी ठेवा. त्याच वेळी त्यांना हवेची आवश्यकता असते, म्हणून लसूण कधीही पिशवीत ठेवू नका.