Eknath Shinde | देशाला महासत्ता करण्यासाठी मतदान करा; एकनाथ शिंदे यांचा युवकांना सल्ला

Eknath Shinde | लोकसभेची ही निवडणूक देशाचा विकास, देशभक्ती, देशाची प्रगती आणि देशाचा नेता निवडण्याची आहे. त्यामुळे आपण विचारपूर्वक आपले भवितव्य आणि परिवाराचे भविष्य हे डोळ्यासमोर ठेऊन मतदान करावे, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांनाz दिला.

हातकणंगले मतदारसंघातील वाठार येथील श्री अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, तरुणाईचा मेळावा हा विषय माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे. आपले एक मत देशाचा इतिहास आणि देश घडविणारे असते. देशाचा विकास करणारे आणि देशाचा नेता घडविणारे असते. लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत असते. देशात एका मताने इतिहास घडलेला आहे. हे आपण अनेकदा पहिले आहे. भारत तरुणाईचा देश आहे. ६५ टक्के नागरिक ३५ पेक्षा कमी वयाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणाईसाठी परीक्षा पे चर्चासारखे कार्यक्रम घेतात. विद्यार्थांना प्रेरित करणे हे त्याचे लक्ष्य आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्या देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी तरुणांचा सर्वांचा महत्वाचा वाटा असेल. देश योग्य आणि मजबूत हातांमध्ये जातो, तेव्हाच देशाचा विकास होत असतो. आता आपला देश मजबूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाकडे नेत आहेत. देश विकसित होत आहे. प्रत्येक घटकासाठी विचार करणारे नेतृत्व आपल्याला लाभले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मला देखील लहानपणापासून सामाजिक आणि लोकांच्या सेवेचा धडा बाळासाहेबांच्या प्रेरणेतून आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीतून मिळाला. बारावीनंतर मला शिक्षण सोडावे लागले. पण मंत्री झाल्यानंतर बीए झालो. एमएचे प्रथम वर्ष पूर्ण केले. मात्र दुसऱ्या वर्ष फायनल करत असताना मोठी लढाई आम्ही हाती घेऊन राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यामुळे माझे शिक्षण अपूर्ण राहिले असून ते पूर्ण करणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला तेव्हा महाराजांचे वय अवघे १६ वर्ष इतके होते. भगतसिंग देशासाठी फासावर गेले तेव्हा त्यांचे वय २३ होते. सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय सामना खेळले तेव्हा देखील त्यांचे वय १६ होते. छत्रपती आपले दैवत आहेत. तर भगतसिंग देशभक्त असल्याने त्यांना दैवत्व प्राप्त झाले. कारण त्यांनी तरुणपणीच एक ध्यास घेतला होता. एक स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. तुम्ही देखील एक ध्येय उराशी बाळगून पुढील वाटचाल केली पाहिजे. आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे, असा सल्लाही मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी उपस्थितांना दिला.

देशाच्या युवाशक्तीवर मोदीजींचा विश्वास आहे. देशाचे नाव जगभरात नेण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. युवा शक्तीवर विश्वास दाखवून इतकेच सांगेन की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले आहे. देशात स्टार्टअपने क्रांती घडवली. शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या. उद्योगांमुळे तरुणांच्या हाताला काम मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तरे दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय