Anand Dighe : आनंद दिघेंच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदेंनी पोस्ट केलेली चारोळी चर्चेत

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन आहे. याचनिमित्त शिंदे यांनी सोशल मीडियावरुन दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिंदे यांनी आपल्या राजकीय गुरुला आंदरांजली वाहण्यासाठीही चारोळ्यांचा आधार घेतला आहे.

“वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” या कॅप्शनसहीत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या प्रत्येक भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आनंद दिघेंचा आवर्जून उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटो पोस्टमध्ये आनंद दिघेंचा फोटो आणि त्याबाजूला चारोळी असल्याचं दिसत आहे.या फोटोवरील चारोळी खालीलप्रमाणे आहे

उरात भरुनी सदैव आपले स्मरण,
मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण…
करीतो गुरुवर्य आपल्या तत्वांचे आचरण,
जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण…