आसाराम बापूंकडे आहे १०००० कोटींची संपत्ती, आता कोण सांभाळतंय त्यांचं आश्रम साम्राज्य?

नवी दिल्ली- 400 हून अधिक आश्रम, 1500 हून अधिक सेवा समित्या, 17000 हून अधिक बालसंस्कार केंद्रे, 40 पेक्षा जास्त गुरुकुल – तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांचे धार्मिक साम्राज्य 10,000 कोटींहून (Asaram Bapu Ashram Empire) अधिक आहे. ट्रस्ट या मालमत्तेची देखरेख करतो आणि त्यांच्या क्रियाकलापांचे व्यवस्थापन करतो. मात्र आसाराम बापूंच्या अनुपस्थितीत या ट्रस्टचे नेतृत्व कोण करत आहे? त्यांच्या देशभर पसरलेल्या आश्रमशाळांचे प्रमुख म्हणून आता कोण काम करत आहे? असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत.

न्यूज18 नुसार, आसाराम बापू किंवा तुरुंगात असलेला त्यांचा मुलगा नारायण साई हे काम करत नाहीत. तर ही जबाबदारी आता आसाराम यांची कन्या (Asaram Bapu’s Daughter) भारतीश्री (Bharatishree) पार पाडत आहे. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था असून तिचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. भारती आता या ट्रस्टच्या मुख्यालयातून दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करतात.

भारतश्रींसोबत राहणार्‍यांचे म्हणणे आहे की, त्या ना केवळ रोज भरपूर प्रवास करत नाहीत, तर देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या आश्रमांचे दैनंदिन कामकाज आणि आर्थिक व्यवहारही नियंत्रित करतात. मात्र, आसाराम बापूंप्रमाणे त्या वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रवचनसारखा कोणताही कार्यक्रम करत नाहीत. आश्रमाव्यतिरिक्त त्या मीडियामध्ये लो प्रोफाइल ठेवतात.

आठ वर्षांपासून पाहतात आश्रम
आसाराम बापूंनी अहमदाबादमध्ये पहिला आश्रम स्थापन केला. भारतीचा जन्म 1975 मध्ये झाला. 2013 मध्ये आसाराम यांना अटक झाली तेव्हा भारती आणि आसाराम बापू यांची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक करण्यात आली होती, पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. गेल्या सुमारे 08 वर्षांत भारती यांची आश्रमाच्या देखरेखीवरील पकड खूप मजबूत झाली आहे, असेही म्हटले जाते.

भारतीश्री सतत कार्यरत असतात. त्या सर्व आश्रमांना भेट देतात. वर्षभरातच त्यांनी आसाराम बापूंच्या धार्मिक साम्राज्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संत श्री आसारामजी ट्रस्टच्या कामावरही देखरेख करण्यास सुरुवात केली आहे.

आश्रमाच्या आवारात व्याख्याने देतात
भारतीश्री महागड्या कार वापरतात. अहमदाबादमधील बाबा आसाराम यांच्या आश्रमाच्या आवारात प्रवचन आणि आरतीला उपस्थित राहतात. त्यांच्याभोवती भक्तांची गर्दी असते. 48 वर्षीय भारती नाटकीय पद्धतीने प्रवचन देतात. प्रवचण देताना त्या नाचतात, गातात.  त्यांचे वडील जसे करायचे तसे त्या स्वतःला फुलांनी सजवतात. आश्रमातील आरती संबंधित उपक्रम दररोज YouTube वर अपलोड केले जातात.

एम.कॉम पर्यंत शिक्षण 
15 डिसेंबर 1975 रोजी जन्मलेल्या भारतीने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी दीक्षा घेतली. त्यानंतर चौदा वर्षे ध्यान आणि योगासने केली. त्यांनू एम.कॉम पर्यंत शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. भारती यांचा विवाह 1997 मध्ये डॉ. हेमंत यांच्याशी झाला होता. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी नंतर घटस्फोट झाला. त्यानंतर भारती आपल्या वडिलांच्या साम्राज्यात महिला आश्रमांचे काम पाहू लागल्या. यासोबतच ती प्रवचनही देऊ लागली.