शिंदेंच्या अत्यंत जवळच्या ‘या नेत्यांनी मारली अयोध्या दौऱ्याला दांडी ? शिंदे गटात नेमकं चाललंय काय ?

Mumbai – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केलं.(CM Eknath Shinde In Ayodhya) रविवारी दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भूसे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

या दौऱ्यात शिंदे यांनी आपला हिंदुत्ववादी बाणा कायम ठेवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यातच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शिंदे गटातील बहुतांश आमदार आणि खासदारांचा समावेश होता. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, तर खासदार भावना गवळी या अनुपस्थित होत्या. हे चौघं अयोध्या दौऱ्यात का सामील झाले नाहीत यावरून आता चर्चांना उधाण आले आहे. तूर्तास तरी काही वैयक्तिक कारणामुळे हे चौघं या दौऱ्यात सामील झाले नाहीत, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय.