Shivajirao Adhalarao Patil | पाच वर्षात एक रुपायाचाही निधी आणला नाही, असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार

Shivajirao Adhalarao Patil | मागील पाच वर्षात शिरूर मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. 80 टक्के खासदार निधी वाया गेला.  विद्यमान खासदार  मतदार संघात फिरकलेच नाहीत. अनेक गावात त्यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी (Shivajirao Adhalarao Patil) विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज मांजरी परिसरात प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, विद्यमान खासदार पाच वर्षात एकदाही मतदार संघात उपस्थित राहिले नाही. त्यांचा 80 टक्के निधी परत गेला आहे. शिवाय केंद्रातून एकही रुपयाचा निधी त्यांना आणता आला नाही. गावोगावी त्यांच्या विरोधातील फलक लावले आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्या विषयी आक्रोश आहे. आज पर्यंत मी केलेल्या प्रचाराला उस्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माझ्या प्रचाराला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता हडपसर मतदार संघातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन