राज्यात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे : नारायण राणे 

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था (Law and order) आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकताच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी  अटक  केल्यानंतर  त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

त्याआधी भाजप नेते मोहित कंभोज (Mohit Kambhoj)  यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर(gopichand padalkar)  यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता सोबतच  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devandra fadanvis) यांच्या गाडीवर सुद्धा चप्पलफेक करण्यात आली होती. या सर्व घडामोडी घडत असताना भाजप नेते  आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही तर फक्त बेबंदशाही चालली आहे. सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत. पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येवून सूड उगवण्याचं काम करत आहेत. राज्यात खून होत आहेत,  दरोडे पडत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत. त्यामुळे अशा काळात राज्यात राष्ट्रपती राजवट येणं गरजेचं आहे, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Central Minister Narayan Rane) यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकूश नाही. नवनीत राणा या खासदार आहेत तर रवी राणा हे आमदार आहेत. मुख्यमंत्री सक्षम आहेत का ? त्यांना राज्याचे प्रश्न माहित नाहीत. त्यांचं शेवटचं भाषण अंतिम आठवडा प्रस्तावावार झालं. पण हे भाषण कलानगरच्या नाक्यावरच्या भाषणासारखं होतं. त्यांनी महाराष्ट्राला दहा वर्ष मागे नेले आहे. 89 हजार कोटी तूट असून राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे.असं ते म्हणाले.