Gautami Patil Viral Video : पब्लिकपुढेच त्याने घेतला गौतमी पाटीलचा मुका, व्हिडिओ तुफान व्हायरल

Gautami Patil- नृत्यांगणा गौतमी पाटील ही नेहमी चर्चेत असते. डान्स करताना अश्लील कृत्य केल्यामुळे गौतमीवर अनेकदा टीका झाली आहे. आपल्या कृतीबद्दल माफी मागितल्यानंतरही अनेकजण गौतमीवर टीकास्त्र सोडताना दिसतात. असे असले तरीही, गौतमीच्या लोकप्रियतेवर याचा तिळभरही फरक पडलेला नाही. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे.

गौतमीला पुणे, कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुपाऱ्या मिळत आहेत. याचदरम्यान, गौतमीचा एक व्हिडिओ (Gautami Patil Viral Video) चर्चेत आला आहे. भरकार्यक्रमात मंचावर एक ‘टेडी’ने गौतमीचा मुका घेतला आहे. या ‘टेडी’वर ‘चतूर गॅरेज वाला’ असे नाव लिहिले आहे.

व्हिडिओत दिसते की, गौतमी स्टेजवर सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम या गाण्यावर नाचतेय. यावेळी तिच्याबरोबर स्टेजवर टेडीचा वेश धारण केलेला एक व्यक्तीही असतो. नाचत असताना गौतमी त्या टेडीजवळ जाते आणि तो टेडी तिच्या गालावर चुंबन देतो. स्टेजवर घडलेला प्रकार पाहून प्रेक्षक मात्र चकित होतात. या व्हिडिओवर अनेकांनी टीका देखील केली आहे. एका युजरने व्हिडिओ पाहून महाराष्ट्राची बिहारशी तुलना केली आहे. तर दुसऱ्या युजरने थेट गौतमी पाटीलला सुधारण्याचा सल्ला दिला आहे.