दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत – सुप्रिया सुळे

नवी दिल्ली – ५ राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच आता पुन्हा एकदा इंधन दरवाढ होऊ लागली आहे. यामुळे महागाई वाढत चालली असून महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

जेव्हा निवडणूका असतात तेव्हा केंद्रसरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्रसरकार तिकडे व्यस्त राहिल परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत अशी टीका सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली.

लोकसभेत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली आहे असा आरोपही सुळे यांनी केला.चा मुद्दा खासदार सुळे यांनी आज मांडला. केंद्रसरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमत देऊन विजयी केले. पण निवडणूका संपताच केंद्रसरकारने पेट्रोल,डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली आहे असा आरोपही सुळे यांनी केला.