Eknath Shinde | बालहट्ट आणि अहंकारामुळे मविआ सरकारमध्ये राज्याचे नुकसान, शिंदेंचा घणाघाती आरोप

Eknath Shinde | भाजपला घाबरवून २० ते २५ आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या ५ नेत्यांना तुरुंगात टाकून महाविकास आघाडी मजबूत करायची. असा प्लॅन उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) डोक्यात सुरु होता, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे केला.

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा (North East Mumbai Lok Sabha) मतदारसंघात भांडूप येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जसे मातृशक्तीचा आदर करायचे. त्याप्रमाणे आपले सरकार महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या काळात प्रकल्पांमध्ये खुट्टा टाकून ठेवला होता. तो काढून आम्ही प्रकल्पांमधील स्पीड ब्रेकर हटविले. आरे कारशेडच्या कामावरील बंदी हटविली. आरे कारशेड केले नसते तर आपण दहा वर्षे मागे गेलो असतो. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० हजार कोटी अधिक लागले असते. बालहट्ट आणि अहंकार यामुळे यापूर्वीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने राज्याचे नुकसान झाले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा