Ramdas Kadam | अनंत गीते यांच्या रुपाने या मतदारसंघाला लागलेला काळा डाग येत्या निवडणुकीत पुसून टाका

Ramdas Kadam | प्रत्येक देशातील व्यवस्था ही भिन्न आहे. मग तुमचा आणि माझा देश एकसंघ ठेवायचा असेल… त्याची एकात्मता टिकवायची असेल तर या देशातील सर्वसामान्य नागरिकांना मतांचा अधिकार दिला पाहिजे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे उपकार तुमच्या – माझ्या देशावर आहेत म्हणूनच ७५ वर्षाच्या गौरवशाली इतिहासामध्ये हा भारत देश एकसंघ राहिला… एकात्मता टिकली आणि या देशाचे सार्वभौमत्व अबाधित राहिले असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी खेड येथील जाहीर प्रचार सभेत काढले.

गुरुवारी रात्री ८ वाजता खेड शहरात महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली.

सदाचाराच्या गोष्टी करणारी माणसे परदेशात जास्ती असतात अशी रामदासभाई तुम्ही माहिती दिलात. थोडीशी आठ दिवस अगोदर माहिती दिली असती तर त्यांची ऐशी की तैशी करुन टाकली असती. आयुष्यभर स्वतःला वेगळी म्हणवणारी माणसे कशापध्दतीने जीवन जगतात याची माहिती दिलात त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे आभार मानले.

दरम्यान अनंत गीते यांना देश फिरण्याचा छंद आहे. निवडणूका संपल्या की वेशभूषा बदलून फिरत असतात असा गौप्यस्फोट माजी मंत्री रामदास कदम यांनी केला. माझ्या मुलाला संपवण्यासाठी अनिल परब यांना आणून उध्दव ठाकरे यांनी विडा उचलला होता असा आरोपही रामदास कदम यांनी केला.

अनंत गीते हा विषय आमच्यासाठी संपला आहे. अनंत गीते यांना आणून मोठा केला तो या मतदारसंघाला लागलेला काळा डाग येत्या निवडणुकीत पुसून टाका असे आवाहन रामदास कदम यांनी केले.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, मनसेचे नेते वैभव खेडेकर, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, शंकर कांगणे आदींसह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे आणि आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय