T20 World Cup 2024 | टी२० विश्वचषक जिंकल्यास पाकिस्तान संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणार ८३.३८ लाख, बोर्डाची मोठी घोषणा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अद्याप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup 2024) संघ जाहीर केलेला नाही, परंतु पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी प्रत्येक खेळाडूला 83.38 लाख रुपये (1,00,000 अमेरिकन डॉलर) रोख देण्याची घोषणा केली आहे.

जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2024) पाकिस्तान क्रिकेट संघाला आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करायचा आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी पाकिस्तान या दोन देशांविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. पीसीबी प्रमुखांनी आगामी दौऱ्यापूर्वी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर आयोजित केलेल्या लंच समारंभात या पुरस्काराची घोषणा केली.

विश्वचषकापूर्वी दोन दौरे
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला 10 ते 14 मे दरम्यान आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाईल, जिथे त्यांना 22 मेपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेत भाग घ्यायचा आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोरमध्ये आयोजित कार्यक्रमात नक्वी यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

“कोणाचीही काळजी करू नका,फक्त पाकिस्तानसाठी खेळा आणि सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहून टीमवर्क दाखवा, विजय तुमचाच असेल. देशाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आम्हाला आशा आहे की यावेळी तुम्ही पाकिस्तानचा झेंडा फडकावून याल.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार