Sunil Tatkare | बुध्दविहारे म्हणजे आमच्या विचारांची, आचाराची, स्वप्नांची एका प्रकारची ताकद देणारी ऊर्जा केंद्रे

Sunil Tatkare | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका… संघटीत व्हा.. आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला पण आपण शिकलो… संघटीत आहोत… आता तुम्हाला जो संघर्ष करायचा तो आता विकासासाठी… तो संघर्ष… तो विकास तुमच्या पायाशी आणून देण्याचे काम महेंद्र दळवी आणि सुनिल तटकरे करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुरुड येथील आंबेडकरी अनुयायांच्या जाहीर मेळाव्यात व्यक्त केला.

आता संघर्ष कुठला करायचा आहे तर तो दिनांक ७ तारखेपर्यंत करायचा आहे. जी विकृत मनोवृत्ती आपल्या आसपास संविधानाबाबत शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करा असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले. माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघात असलेली ही बुध्दविहारे म्हणजे आमच्या विचारांची… उद्याच्या भविष्याची… आमच्या आचाराची आमच्या स्वप्नांची… एका प्रकारची ताकद आणि शक्ती देणारी आमची ऊर्जा केंद्रे आहेत असे उद्गार सुनिल तटकरे यांनी काढले.

लोकशाही प्रणाली व्यवस्था म्हणजे पाश्चात्य देशातील मुठभर लोकांना मतदानाचा अधिकार आहे. पण तुमच्या आणि माझ्या देशात श्रीमंत असलेल्या उद्योगपतींच्या मतांची किंमत जेवढी आहे तेवढीच किंमत माझ्या सर्वसामान्य नागरिकांना आहे हे समान तत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्यामुळे हा देश एकसंघ राहिला असेही सुनिल तटकरे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना स्वीकारली आणि देशाने प्रजासत्ताक भारत… याचा अर्थ जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य होते. प्रजासत्ताक याचा अर्थ प्रजेची सत्ता… हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते. प्रजा कोण तर या देशात राहणारा प्रत्येक नागरीक… ती माझी प्रजा आहे हे मानण्याचा मोठेपणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला त्यातून हा देश एकसंघ राहिला असे प्रतिपादनही सुनिल तटकरे यांनी केले.

आज आपल्यामध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलले जाईल. हे धांदात खोटं आहे हे… ज्या मजबूत सिध्दांतावर तुम्ही – आम्ही उभे आहोत तो लोकशाहीचा सिध्दांत चंद्र – सुर्य असेपर्यंत या देशातील संविधान अबाधित राहिल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनासुध्दा ब्रिटिशांनी मंत्री केले होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याची, वीजेची, सिंचनाची व्यवस्था करावी लागेल हा विचार स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी दिला. त्यांनी घटना दिली त्या बाबासाहेबांना संसदीय लोकशाही व्यवस्था सुरू झाली त्याचवेळी लोकसभेत जाऊ दिले नाही. त्यांना पराजित केलात असा आरोप सुनिल तटकरे यांनी कॉंग्रेसवर केला.

शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत. अनंत गीते तुम्ही आंबेडकरी जनतेला कधी भेटलात का? त्यांचे विचार समजून घेतले का? असा संतप्त सवालही सुनिल तटकरे यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन