Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा

शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) निवडणुकीचा प्रचार आता वेग घेत आहे. चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या महातदारसंघात आता राज्य पातळीवरील नेत्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय नेते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. एकमेकांवर आक्षेप घेत आहेत, तर सडकून टीका करत आहेत. दरम्यान शिरुर लोकसभेच्या मैदानातुन भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंसह (Amol Kolhe) आमदार अशोक पवारांवर निशाना साधला. प्रविण दरेकर शिरुर तालुक्यातील न्हावरा येथील जाहिर सभेतुन बोलत होते

शिरुर लोकसभा (Shirur LokSabha) मतदार संघात अमोल कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता कोल्हेंना कवडीमोल करेल अशा शब्दात प्रविण दरेकरांनी कोल्हेंवर निशाना साधलाय यावेळी आमदार अशोक पवारांवरही दरेकरांनी निशाना साधला. देवस्थानच्या जमिनीवर उभा राहिलेला घोडगंगा साखर कारखाना बंद ठेवुन स्वतच्या मालकीचा साखर कारखाना सुरु ठेवला, याचा हिशोब अशोक पवारांना चुकता करावा लागेल. निवडणूकीनंतर घोडगंगा साखर कारखान्यात यांनी काय घोडं मारलय हे जनतेसमोर येईल, असं म्हणत प्रविण दरेकरांनी अशोक पवारांवरही निशाना साधलाय

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा