फाशी झाली तरी पश्चाताप नाही, स्वर्गात अप्सरा मिळतील; आफताबने धक्कादायक विधान केले

नवी दिल्ली –  लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोपी आफताब अमीन पूनावालाची चौकशी आणि पॉलीग्राफ चाचणीनंतर धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत आहे. चौकशीदरम्यान त्याने प्रथमच धक्कादायक खुलासा केला आहे.
आफताबची धर्मांध मानसिकता समोर आली

एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याने म्हटले आहे की, श्रद्धाच्या हत्येप्रकरणी त्याला फाशी झाली तरी त्याला त्याचा पश्चाताप होणार नाही, तो स्वर्गात गेल्यावर त्याला अप्सरा मिळतील.  इतकंच नाही तर श्रद्धासोबतच्या रिलेशनशिपदरम्यान 20 हून अधिक हिंदू मुलींशी त्याचे संबंध असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांना दिलेल्या जबानीतून आफताबची धर्मांध मानसिकता समोर आली आहे.

श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, असे तो म्हणाला. तो पोलिसांची दिशाभूल करत राहिला. चेहऱ्यावर चिंता कधीच दिसून कधीच आली  नाही. चौकशी संपली की तो शांत झोपायचा. त्याने मुंबईतच श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले.जागरणने याबाबत वृत्त दिले आहे.