‘द काश्मीर फाईल्स’मध्ये सत्य दाखवलंय, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Mumbai – गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा निरोप समारंभ पार काल ( २८ नोव्हेंबर ) पार पडला. मात्र, हा निरोप समारंभ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या समारंभात बोलताना मुख्य ज्युरी नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट ‘व्हल्गर’ ( अश्लिल ) आणि ‘प्रोपगंडा’ ( प्रचारकी ) असल्याचं मत नदव लॅपिड यांनी मांडलं. यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान,  ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमात वास्तव दाखवलं गेलंय. काश्मिरी पंडितांवरील अन्यायावर या सिनेमातून भाषिय करण्यात आलंय. या सिनेमासाठी रिसर्च केला गेला आहे. अभ्यास करून ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा तयार केला गेलाय, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.