चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा सठिया गया है, हा माणूस पिसाळला आहे – गायकवाड 

मुंबई – नेहमी भडक वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे पुन्हा एकदा भडक वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत.शिंदे गटावर चंद्रकांत खैरे यांनी नवा आरोप केलाय. गुवाहाटी दौऱ्यात आमदारांना पाच-पाच कोटी देण्यात आले. असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय.

२६ नोव्हेंबरला शिंदे गटाचे आमदार पुन्हा गुवाहाटीला गेले. कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी स्फोटक आरोप केलाय. शिंदे गटाचे आमदार इकडे तिकडे भरकटू नये म्हणून आणखी पाच-पाच कोटी आमदारांना देण्यात आल्याचा आरोप खैरे यांना केलाय.

दरम्यान, या वक्तव्याचा शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.  संजय गायकवाड म्हणाले, “चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा सठिया गया है. त्याला कधीही काहीही स्वप्न पडतात. आम्ही इकडे एवढे पैसे घेतले, आम्ही तिकडे तेवढे पैसे घेतले, असा आरोप ते करतात. पण आम्ही जाहीरपणे सांगतो की, आम्ही आमचा मुख्यमंत्री केला आहे. त्यामुळे आम्हाला पैसे मिळण्याचा काही संबंधच नाही. आम्ही इतर पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर हे आरोप आम्हीही मान्य केले असते. आम्ही काम करणारा मुख्यमंत्री निवडला आहे. तरीह चंद्रकांत खैरे बावचळल्यासारखी विधानं करतात. हा माणूस पिसाळला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या आरोपांकडे फार लक्ष देत नाही. त्यांनी जे आरोप केलेत, तसा प्रकार कुठेही घडला नाही.”