मुख्यमंत्र्यांचा जबरा चाहता; चक्क डोक्यावर कोरली एकनाथ शिंदेंची प्रतिमा

Pandharpur  – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या सरकारच्या स्थापनेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका लावला आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा पंढरपूरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलाय. मेळाव्याला तरुणांची गर्दी जमलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाहत्याने डोक्यावर एकनाथ शिंदेंचा चेहरा कोरून घेतलाय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं जबरदस्त फॅन फॉलोईंग (Eknath Shinde Fan Following) दिसून येतंय.

पंढरपूरात शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा आहे. या मेळाव्यात आलेल्या एका तरुणाने डोक्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिमा आणि गळ्यात शिवसेनेचं उपरणं घातलंय. शिंदे गट अजूनही स्वतःला शिवसेना असल्याचंच म्हणतोय त्यामुळे या मेळाव्यात शिवसेना लिहीलेले उपरणं वाटण्यात आलेत.