संजय राऊत यांच्यामुळे आमदारांमधील मतभेदाची दरी अधिक वाढली; योगेश कदम यांची टीका 

रत्नागिरी   – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्या गटाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत प्रचंड टीका करत आहेत.

शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांच्या मनात संजय राऊत यांच्याबद्दलची प्रतिमा चांगली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे मुख्य शिवसेनेत असलेल्या आमदार-खासदार आणि नेत्यांमध्ये बंडखोरांविरोधात रोष आहे.  दरम्यान, एवढं सगळं होऊन देखील संजय राऊत यांचा दांडपट्टा सुरूच असल्याचे चित्र आहे.  यावरूनच आता आमदार योगेश कदम यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांमुळेच मतभेदाची दरी अधिक वाढली, असं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांना सर्व आमदार नाराज आहेत हे आधीच माहीत होतं. संजय राऊत यांच्यामुळे आमदारांमधील मतभेदाची दरी अधिक वाढली. सेनेत असताना सेनेतीलच नेत्यांकडून आमचं होत असलेलं खच्चीकर यामुळे आम्ही वेगळी भूमिका घेतली. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांमध्ये मतभेदाची दरी अधिक वाढली, असा आरोप त्यांनी केला आहे.