निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

Sunil Tatkare – लेखी आणि तोंडी परीक्षेत २५ – २५ मार्क असतात तसे मैदानी परीक्षेतही ५० मार्क असतात त्यामुळे आमदारांची लोकशाही मार्गाने निवडून आलेली स्टेंथ म्हणजे मैदानी परीक्षा असते त्यामुळे निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(NCP State President MP Sunil Tatkare)  यांनी ‘निवडणूक आयोगाचा पेपर फुटला’ या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.

आज प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी विरोधकांनी केलेल्या टिकेला सडेतोड उत्तर दिले. निवडणूक आयोगाचा पेपर फुटला आहे तो पेपर फुटल्यामुळे प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे (Praful Patel and Dhananjay Munde) यांनी फुटलेल्या पेपरवर प्रतिक्रिया दिली आहे असे ऐकण्यात आले. हा पेपर फुटायचे कारणच नाही. निवडणूक आयोगाची जी काही परिक्षा आहे त्यात सरळ सांगायचे झाले तर लेखी परीक्षेत २५ तर तोंडी परीक्षेला २५ मार्क आहेत आणि मैदानी परीक्षेला ५० मार्क आहेत असे प्रत्येक परीक्षेचं एक विश्लेषण असते… सरकारी भरत्या होत असतात त्यावेळीही लेखी, तोंडी, आणि मैदानीला मार्क असतात… त्यामुळे त्यामध्ये कुठल्या विषयाला मार्क ठरलेले आहेत. त्या मार्काचा अभ्यास करत कदाचित प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे व माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ता म्हणत असेल त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब ठरेल असे सांगतानाच निवडणूक आयोगाची स्वायत्तता, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेला निकाल याची कायदेशीर, ज्येष्ठ विधीज्ञासोबत चर्चा करून सामुदायिकरित्या लोकशाही मार्गाने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

दादांच्या नाराजीच्या कल्पोकल्पित कथा किंवा त्यासंदर्भातील भाष्य आमच्यावर प्रेम करणारे जे काही हितचिंतक आहेत ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठलीही नाराजी अजितदादा यांच्या मनात किंवा मंत्र्यांच्या, आमदारांच्या मनात आजपर्यंत नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. त्या विचारांशी समरस होऊनच काम करण्याची आमची सर्वांची तयारी आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

लवकरात लवकर पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात येईल हे अगोदरच सांगितले होते. आज राष्ट्रवादीच्या सात नेत्यांना वेगवेगळ्या जिल्हयांची पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचे खासदार सुनिल तटकरे यांनी आभार मानत अभिनंदनही केले.

तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात येते त्यावेळी वेगवेगळ्या पक्षाची राजकीय परिस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे विलंब होऊ शकतो. नाशिकमध्ये विधानसभेचे पाच सदस्य आहेत. भुजबळसाहेबांसारखे ज्येष्ठ नेते राज्याच्या मंत्रिमंडळात प्रभावशालीपणे काम करत आहेत. नगर जिल्ह्यात पाच आमदार आहेत. नगरमधून आम्हाला यावेळेच्या मंत्रीमंडळात कुणाला सहभागी करता आले नाही. संख्येची मर्यादा होती त्या मर्यादेनुसार महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक विभागाला सामावून घ्यायचं होतं आणि संबंध बहुजन समाजाला सामावून घेत आहोत. मंत्रीमंडळात अगदी योग्य पध्दतीने खाती मिळाली आहेत. रायगडमध्ये वेगळी मागणी राहिली आहे त्यामुळे रायगड, नाशिक, अहमदनगर प्रलंबित आहे. त्यातून नक्कीच मार्ग निघेल. आता आम्ही एकदिलाने महायुतीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जायचे निश्चित केले आहे. उर्वरित निर्णय म्हणजे पालकमंत्री किंवा विस्तार असेल योग्य वेळी घेतले जातील असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

AAP खासदार संजय सिंह यांना ED ने दीर्घ चौकशीनंतर अटक केली

Gram Panchayat Election : राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर

Puneet Balan : अनधिकृत जाहिरात लावल्याने ३.२० कोटीचा दंड; पुनीत बालन यांना नोटीस