Florida Weather Update | फ्लोरिडामधील टी20 विश्वचषकातील तीनही सामने रद्द होणार? मुसळधार पावसाने चिंता वाढवली

Florida Weather Update | टी20 विश्वचषक 2024 हळूहळू सुपर-8 टप्प्याकडे सरकत आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळली जात आहे. विश्वचषकात गट टप्प्यातील काही सामने अमेरिकेत तर काही वेस्ट इंडिजमध्ये होत आहेत. पण त्याच दरम्यान फ्लोरिडातील हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 26 लीग सामने खेळले गेले आहेत आणि फ्लोरिडामध्ये तीन लीग सामने खेळले जातील, ज्यामध्ये भारत विरुद्ध कॅनडा (India vs Canada) सामना देखील आहे.

भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना शनिवारी 15 जून रोजी फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर होणार आहे. फ्लोरिडामध्ये टी20 विश्वचषकाचे एकूण चार सामने झाले. येथे पहिला सामना 12 जून रोजी श्रीलंका आणि नेपाळ यांच्यात होणार होता, जो पावसामुळे गमावला होता. नाणेफेक न होता सामना रद्द करण्यात आला. येथे अजून तीन सामने खेळायचे आहेत.

येथे खेळल्या जाणाऱ्या उर्वरित तीन सामन्यांनाही पावसाचा फटका बसू शकतो. फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर उर्वरित तीन सामने यूएसए विरुद्ध आयर्लंड (14 जून), भारत विरुद्ध कॅनडा (15 जून) आणि पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड (16 जून) हे असतील. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होतील.

मियामी, फ्लोरिडामध्ये पूरसदृश परिस्थिती (Florida Weather Update)
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फ्लोरिडाच्या मियामीमध्ये वादळ आले होते, त्यानंतर पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील समस्या वाढत आहेत. मुसळधार पावसानंतर येथील रस्ते पाण्याने भरलेले दिसत आहेत, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांपैकी किती सामने येथे पूर्ण होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जरी टीम इंडिया आधीच सुपर-8 साठी पात्र झाली आहे. अशा परिस्थितीत, फ्लोरिडामध्ये कॅनडाविरुद्ध खेळला जाणारा टीम इंडियाचा सामना पावसामुळे रद्द झाला, तरी संघाला पात्रतेशी संबंधित कोणतीही अडचण येणार नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप