Gautami Patil New Song | गौतमी पाटील आणि सुशांत पुजारीचे “घे दमानं” हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने अल्पावधीत लोकप्रिय झालेली गौतमी पाटील ( Gautami Patil New Song) नेहमीच चर्चेत असते. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा घे दमानं एक अल्बम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या जोडीला ए बी सी डी, ए बी सी डी २, स्ट्रीट डान्सर अश्या विविध हिंदी कलाकृतीतून रसिकांसमोर आलेला अभिनेता व डान्सर सुशांत पुजारी असणार आहे.

सिनेशाईन एंटरटेनमेंटचे श्रीनिवास कुलकर्णी आणि अमोल घोडके यांनी “घे दमानं” या गाण्याची निर्मिती केली असून, हे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे, गाण्याचे संगीत शैलेश चंद्र लोखंडे यांचे असून, गायक हर्षवर्धन वावरे व कविता राम यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे, या गाण्याचे दिग्दर्शन राहुल झेंडे यांनी केले असून पुण्यकर उपाध्याय यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे, तर कॅमेरा वर्क मनोज काकडे यांनी केले आहे, पुण्यातील पी बी ए फिल्म सिटी या निसर्गरम्य ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आलं आहे.

गाण्याबद्दल बोलताना, गौतमी पाटील (Gautami Patil New Song) म्हणाली की, “हे गाणं मी आजवर केलेल्या गाण्यांपेक्षा वेगळं आहे, यामद्धे माझा थोडासा वेगळा लुक आणि नेहमीपेक्षा वेगळ्या हुक स्टेप करताना खूप मजा आली.” सुशांत पुजारी गाण्याबद्दल बोलताना म्हणाला कि, “हे गाणं निवडण्यापूर्वी अनेक गाण्यांना नकार दिला होता, मी मुख्यतः एक डान्सर असल्यामूळे मला अशाच प्रकारच्या नृत्यात्मक गाण्याची गरज होती, हे गाणं ऐकल्यानंतर लगेच मी होकार दिला.”

निर्माता अमोल घोडके गाण्याबद्दल म्हणाले कि, “सुशांत पुजारी माझा चांगला मित्र आहे, तो एक अतीशय कुशल डान्सर आहे, वरून धवन, हृतिक रोशन, श्रद्धा कपूर, रेमो डिसुझा अश्या दिग्गज मंडळींसोबत त्याला आजवर आपण स्क्रीनवर पहिले आहे आम्हाला त्याच्यासोबत अनेक दिवसांपासून काम करण्याची संधी हवी होती या गाण्याच्या निमित्ताने ती पूर्ण करता आली याचा आनंद आहे. तसेच निर्माते श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले कि,”गौतमी पाटीलचे नृत्यकौशल्य सर्वांनीच पाहिलेले आहे, परंतु तिची कास्टिंग करताना आम्ही तिला नेहमीपेक्षा वेगळा लुक देण्यावर ठाम होतो, तसेच नृत्याच्या स्टेप देखील जाणीवपूर्वक तिच्या आधीच्या गाण्यापेक्षा वेगळ्या ठेवण्याबाबत आम्ही नृत्यदिग्दर्शकाशी चर्चा केली होती. त्यामुळे रसिकांना या गाण्याच्या माध्यमातून गौतमी नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात रसिकांसमोर येणार आहे, व लोकांना देखील हे गाणं नक्कीच पाहायला आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप