#Breaking : पुणे रेल्वेस्थानकावर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ

पुणे : पुणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली.( Pune railway station) स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात वस्तू सापडल्या आहेत. ही स्फोटके नक्की कोणत्या स्वरुपाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेची वर्दी मिळताच बॉम्बशोधक पथक(Bomb Squad)  घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेनंतर सुरक्षायंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. सध्या पुणे रेल्वे स्थानक(Pune Railway Station) रिकामे करण्यात आले आहे. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबण्यात आल्या आहेत. थोड्याचवेळात बॉम्बशोधक पथक या स्फोटकसदृश वस्तूंची तपासणी करेल.

ही वस्तू इथे कशी आली, कोणी आणली या संदर्भात चौकशी सुरु आहे. अद्याप या वस्तूची स्पष्टता होऊ शकलेली नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून स्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. पोलीस प्रशासनाचा देखील या ठिकाणी मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.