‘इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत’

कोल्हापूर – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीच्या भोवतीचं बांधकाम हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय बनला होता. याच अनधिकृत बांधकामावर सरकारनं हातोडा मारला आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता. त्याच शिवप्रतापदिनाचा मुहूर्त साधत कबरीभोवतीच्या बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सरकारचा हा सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike On Afzal Khan Tomb) मानला जातोय.

दरम्यान,   स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनीही या कृतीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले,  अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीतअशी मागणी देखील त्यांनी केली आहे.