Kiran Mane | भारतीय इतिहासात यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्याचा दर्जा इतका घसरू दिला नव्हता

Kiran Mane | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे असे म्हटल्याचा दावा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. तसेच या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिम लोकांचा असल्याचं काँग्रेसने (Congrss) या आधीच स्पष्ट केलंय, ज्यांना जास्त मुलं त्यांना जास्त संपत्ती मिळेल असा होते असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजस्थानातील बांसवाडा येथे बोलताना केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. दरम्यान शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी यावरुन पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

किरण माने म्हणाले, आपल्या मुस्लीम बांधवांसंदर्भात माननीय पंतप्रधान महोदयांनी द्वेषपूर्ण भाषण केले आणि डाॅ. मनमोहनसिंग यांच्या वक्तव्यात फेरफार करून बदनामी होईल असे वक्तव्य केले… याबद्दल देशभरातून वीस हजारपेक्षा जास्त लोकांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र लिहिले आहे. अजूनही अनेकजण पत्रं पाठवत आहेत. संख्या वाढतच आहे.

या अतिशय लाजीरवाण्या प्रकाराची जगभरातून छ्छी थ्थू होत आहे. टाइम मॅगझिन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनएन, बीसीसी इत्यादी आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही याबाबत संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खरंतर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले होते की “देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मागास, दलित, वंचित आणि अल्पसंख्यांकांचा आहे.”भाजपाचा राग नक्की कुणावर आहे हे या घटनेमुळे उघड झाले आहे.

यापुर्वी संपूर्ण देशात अनेक अल्पसंख्याक आणि दलित मतदार होते, जे भाजपाचं समर्थन करत होते… पंतप्रधानांच्या या दर्पोक्तीनंतर ते सगळेच्या सगळे खूप वेगाने भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत. विश्वासघाताची, संतापाची आणि उद्वेगाची लाट निर्माण झाली आहे. याउलट राहुल गांधी यांनी काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या ‘न्याय योजनां’कडे ते सगळे आकर्षित झाले आहेत.

राजकीय विश्लेषकांचे मत आहे की भारताच्या संपूर्ण इतिहासात यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्याचा दर्जा इतका घसरू दिला नव्हता. या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या न्याय योजना आणि मोदीजींचं हे भाषण ‘गेमचेंजर’ ठरणार हे नक्की !, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा