Baramati LokSabha | “मी ज्या कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा दिला त्यांपैकी कोणी चुकला तर पुन्हा अजित पवारची पायरी चढायची नाही”

बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे.  शरद पवार आणि अजित पवार यांचे होम पिच बारामती आहे यामुळे  इथे अनेक कार्यकर्त्यांची अडचण झाल्याचे दिसते, परिणामी काही लोक ताई आणि दादा असे दोघांच्याही संपर्कात आहे किंवा दोघांच्याही सभांना हजेरी लावतात, अशा कार्यकर्त्यांना सज्जड दम देत “कुंकू लावायचं असेल तर एकाचेच लावा, माझं तरी लावा नाही तर त्यांचे तरी लावा” असे अजित पवार यांनी सुनावले.

बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मंतदारससंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सासवड येथे आयोजि सभेत अजित पवार बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी ज्या माणसांना प्रतिष्ठा दिला त्या कार्यकर्त्यांच्या पैकी जर कोणी चुकला तर परत अजित पवारची पायरी चढायची नाही. अनेकांना जिंकून आणण्यासाठी मी जीवाच रान केलं. कोणाला दूध संघाचा डायरेक्टर केलं तर बऱ्याच जणांना संस्थांच्या संचालक पदी  निवडून आणल. मात्र, आता त्यांनी माझ्याशी कस वागायचं  हे ठरवायचं आहे. मागे बँकेच्या निवडणुकीत गंमत झाली. पण ती सहकाराची निवडणूक होती त्यात तुमच्या आमच्या पाण्याचा प्रश्न नव्हता. पण या निवडणुकीत असं करून चालणार नाही. यामुले घड्याळं चिन्हाळा मत देऊन विकासाला साथ द्या.

दरम्यान अजित पवार म्हणाले, सरकार चालवताना आम्हाला सगळेच बघावे लागते, फक्त बारामती बघून चालत नाही.  इंदापूर, दौंड, पुरंदर असे सगळेच बघावे लागते. पण अडकलेल्या कामातून मार्ग काढायचा असेल तर मी सांगतो पुन्हा ते दुसरं कोणीही करू शकत नाही केंद्रात येणारच सरकार करू शकेल. आत्ता आमचं जे युतीचं सरकार आहे, त्याच मदतीने हे होवू शकेल. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तो मतदार राजा आहेत त्यांनी आपले पवित्र मतं आम्हाला द्यावे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा