Sunetra Pawar | ‘सुनेत्रावहिनींच्या ऐतिहासिक विजयाचे वाटेकरी होवू’ म्हणत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून सुनेत्रा पवारांना जाहिर पाठींबा

Sunetra Pawar | बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने (Republican Party) भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा देवून न थांबता सुनेत्रावहिनींच्या ऐतिहासिक विजयाचे वाटेकरी होवू अशी ग्वाही या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे, सोलापूरचे दिपक चंदनशिवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, रेहाना मुलाणी, साधना केकाण, सचिन सपकळ आदी मान्यवर उपस्थित होते.

अजितदादांच्या कामाची पद्धत सर्वज्ञात आहे. जात-पात, गट-तट न पाहता आलेली व्यक्ती आपलीच आहे असे समजून अजितदादा जनतेची कामे करत असतात. त्यांच्या कामाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळेच आज सर्व घटकातून पाठिंबा मिळत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सर्वांनी एकजुटीने काम करुन घड्याळाचे चिन्ह तळागाळात पोहोचवण्याचे आवाहन करत तुम्ही दिलेल्या हाकेला आम्हा उभयंतांकडून तत्पर प्रतिसाद मिळेल असेही त्यांनी नमूद केले.

आमदार दत्तात्रय भरणे यांनीही कार्यकर्त्यांना कधीही अंतर दिले जाणार नाही अशी ग्वाही देत सुनेत्रा पवार यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा