1 एप्रिलपासून बदलणार औषधांच्या किंमती… भारतात पॅरासिटामॉलसह ‘ही’ आवश्यक औषधे महागणार

सरकारने जनतेसाठी एक नवीन भेट जाहीर केली आहे. सरकारच्या घोषणेनुसार, गंभीर आणि दुर्मिळ आजारांसाठी इतर देशांतून आणलेली औषधे, वैद्यकीय वस्तू तसेच वैयक्तिक वापरासाठी औषधे आणि खाद्यपदार्थांवरील सीमाशुल्क पूर्णपणे रद्द करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. हे आयात शुल्क 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. तसेच, विविध प्रकारच्या कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या पेम्ब्रोलिझुमॅब (कीट्रूडा) वरील मूलभूत सीमाशुल्कात सरकारने सूट दिली आहे. औषधे/गोळ्यांवर सामान्यत: 10 टक्के मूलभूत सीमा शुल्क आकारले जाते, तर काही विशिष्ट श्रेणीतील जीवनरक्षक औषधे/लसींवर 5 टक्के किंवा शून्य सवलतीचा दर लागू होतो.

राष्ट्रीय धोरण 2021 लागू
वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण 2021 मधील दुर्मिळ आजारांसाठी सूचीबद्ध केलेल्या सर्व गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या सर्व औषधे आणि विशिष्ट प्रकारच्या अन्नावरील कस्टम ड्युटी पूर्णपणे माफ केली आहे.

कस्टम ड्युटीमधून पूर्णपणे सूट
कस्टम ड्युटी सूट मिळविण्यासाठी, वैयक्तिक आयातदारास केंद्र किंवा राज्य संचालक आरोग्य सेवा किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल. सध्या, सरकार स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रॉफीसाठी औषधांच्या आयातीवर आधीच कस्टम ड्युटी सूट देत आहे. परंतु इतर गंभीर आजारांसाठी आवश्यक औषधे आणि औषधांच्या आयातीवर कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्याची मागणी करण्यात आली.

या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधे आणि विशेष खाद्यपदार्थ खूप महाग आहेत आणि ते आयात करावे लागतात. एका अंदाजानुसार, दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या 10 किलोच्या मुलाच्या उपचाराचा वार्षिक खर्च 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असतो. हा उपचार आयुष्यभर सुरू राहतो आणि वय आणि वजन वाढले की औषधांचा डोस आणि त्यावर होणारा खर्चही वाढत जातो.

1 एप्रिलपासून भारतात औषधांच्या किमती वाढणार आहेत
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की औषधांवरील कस्टम ड्युटीमध्ये सूट ऐकून अनेकांना आनंद होईल. मात्र पॅरासिटामोलसह अनेक आवश्यक औषधांच्या किमती भारतात वाढणार आहेत. जनता आधीच महागाईचा चटका सोसत असून, सरकारने काही दिवसांपूर्वी पॅरासिटामॉलसोबतच अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती एप्रिल महिन्यापासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अँटिबायोटिक्स, अँटी-इन्फेक्टीव्ह, पेन किलर, हृदयविकारावरील औषधे या औषधांच्या यादीत अग्रस्थानी आहेत.

फार्मास्युटिकल कंपनी आता होलसेलमध्ये महागड्या दराने औषध विकणार आहे. ‘होल सेल इंडेक्स’च्या वार्षिक औषध खर्चातही वाढ करण्यात आली आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने सोमवारी सांगितले की 2022 मध्ये घाऊक किंमत निर्देशांक (WPI) 12.12 टक्क्यांनी वाढला आहे. आता 2023 मध्ये पुन्हा एकदा या औषधांच्या किमती वाढणार आहेत. जे 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल.

(टीप- या लेखात नमूद केलेल्या पद्धती, माहिती आणि सूचना व्यावसायिकांनी दिलेल्या इनपुटवर आधारित आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.)