Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेसाठी पारंपारिक पद्धतीने दवंदी देऊन आमंत्रण, होतेय भरपूर चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) महाराष्ट्रात जोरदार प्रचार सभा होत आहेत. याच अनुषंगाने उद्या पुण्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक सभा होत आहे. या सभेला बारामती, मावळ, शिरूर सह पुणे लोकसभा मतदारसंघातील लोकांची गर्दी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काल भाजपचे युवा नेते गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पारंपारिक दवंडीद्वारे पुणेकरांना निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा आहे.

गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सभेसाठी पुण्य नगरीचे ग्राम दैवत श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर, तांबडी जोगेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, ताथवडे उद्यान अश्या शहरातील विविध भागात दवंडीद्वारे पारंपरिक पद्धतीने निमंत्रण देण्यात आले. याशिवाय शहरातील विविध भागात, विविध मंदिरे, सामाजिक – ऐतिहासिक ठिकाणी आणि कलाकार कट्टा इत्यादी मोक्याच्या ठिकाणी दवंडी देत पुणेकरांना जास्तीत जास्त संख्येने मोदींच्या सभेला उपस्थित राहावे म्हणून निमंत्रित केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा