Eknath Shinde | हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली जिल्ह्यातील कामेरी या गावी गेले होते. प्रचारसभा सुरू असताना स्थानिकांनी या गावात राहणारे ज्येष्ठ सिनेकलावंत विलासराव रकटे हे सध्या अत्यंत हालाखीत जीवन जगत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना सांगितले.
विलासराव रकटे यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हुन अधिक मराठी सिनेमांमध्ये चरित्र भूमिका साकारल्या आहेत, मात्र तरीही पडत्या काळात त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. त्यांनी तत्काळ या गोष्टीची दखल घेऊन त्यांना सन्मानाने सभास्थळी बोलावले. त्यानंतर वैयक्तिकरित्या त्यांना 5 लाख रुपये मदत म्हणून देत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या मदतीबद्दल सभेनंतर रकटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन
Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा