Govt scheme : माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना

माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना

योजनेचे स्वरुप
सैनिक कल्याण विभागाच्या कल्याणकारी निधीमधून  माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या आश्रितांसाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचारांसाठी व उपकरणासाठी आर्थिक मदत देण्यात येते.

योजनेअंतर्गत आर्थिक लाभ
◆वैद्यकीय मदतीसाठी वित्तीय अधिकार –
१. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी :  ७ हजार रुपये पर्यंत.
२. संचालक, सैनिक कल्याण विभाग – १ लाख २५ हजार रुपये पर्यंत.
◆वैद्यकीय उपकरणांसाठी –
१.श्रवण यंत्र व दाताच्या कवळीसाठी – ५ हजार रुपये.
२.अपंग सैनिकास तीनचाकी सायकलसाठी- ८ हजार रुपये व स्वयंचलित माशीनसाठी वेगळे अनुदान १५ हजार रुपयांपर्यंत.
३.अपंग माजी सैनिक/कुटुंबियांना कुबडी तसेच इतर वैद्यकीय उपकरणासाठी- प्रत्यक्ष येणाऱ्या खर्चाइतकी आर्थिक मदत देण्यात येते.
◆माजी सैनिक/विधवा पत्नीला व अवलंबिताना देखभालीसाठी देण्यात येणारी पुनरावर्ती वैद्यकीय आर्थिक मदत-
१.असाध्य प्रकारचे गंभीर आजार उदा. ह्रदय रोग, कॅन्सर, मूत्रपिंड इत्यादी – आर्थिक मदत दरमहा
१ हजार रुपये व वार्षिक जास्तीत जास्त १० हजार पर्यंत. ही मदत शस्त्रक्रियेनंतर एक वर्षासाठी दिली जाईल.
२.अर्धांगवायू आजार झाला असेल किंवा मूत्रपिंडाचे डायलिसिस सुरू असेल व सोबत दुसऱ्या व्यक्तीची गरज पडत असल्यास आर्थिक मदत दिली जाईल. ही मदत वार्षिक नूतनीकरण करून पुढील वर्षासाठी सुरू करता येईल.
◆मोतिबिंदू एका डोळ्याच्या ऑपरेशनसाठी – ५ हजार रुपये.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा