Chandrashekhar Bawankule | मोदींचा एकेरी उल्लेख करणं राहुल गांधींना शोभत नाही, त्यांनी औकातीत राहावं, बावनकुळेंची घणाघाती टीका

Chandrashekhar Bawankule | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

आपल्या एक्स अकाउंटवरुन ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदींच्या पाठीशी आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला. निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन