Shirur LokSabha | अपघातानंतर दिलीप वळसे पाटील शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारात उतरणार

पुणे | शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ) यांच्यासाठी महायुतीतील सर्व नेते प्रचारात दिसत असले तरी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) कुठेही दिसत नाहीत यावरून चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. आता एका वृत्त वाहीनिशी बोलताना त्यांनी आढळराव पाटील जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक (Shirur LokSabha) चौथ्या टप्प्यात पार पडणार आहे.

मागील महिन्यात झालेल्या अपघातानंतर आजारी असल्याने प्रचारात नव्हतो, मात्र तब्येत बारी झाल्या नंतर आढळराव पाटलांचा प्रचार करणार असल्याचे सांगत आढळराव पाटील शंभर टक्के विजयी होतील असा विश्वास  वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

या विषयी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले,  माझी प्रकृती आता एकदम उत्तम आहे. गेल्या 15 दिवसांत त्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. अजुन थोडी सुधारणा झाल्याबरोबर मी माझ्या मतदार संघातील जनतेशी संवाद साधणार आहे, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार देखील करणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा