Ajit Pawar | माझ्या बायकोला ढिगानी मतं द्या, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही,’ अजित पवारांचे वक्तव्य

Ajit Pawar | राज्याचा आणि देशाचा विकास झाला पाहिजे. तोच आम्हाला हवा आहे आणि याच मुद्द्यावर आम्ही महायुतीसोबत लोकसभा निवडणूक लढवत आहे. बारामतीसारखाच विकास दौंडमध्येसुद्धा केला जाईल. लागेल तेवढा निधी आमच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा व जलसंपदा खाते आहे. त्यासाठी अर्थ खात्यावरूनच सर्व निधी वर्ग केला जातो, हेसुद्धा लक्षात असूद्या. सर्वांच्या विकासासाठी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजयी करा. ‘माझ्या बायकोला ढिगानी मतं द्या, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

केडगाव चौफुला (ता. दौंड) येथे बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. येथे ते बोलत होते.

तसेच यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, लोकसभेला आम्ही कमी बोलू, काम मात्र जास्त करू. सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजयी करू हे नक्की आहे. राजकारणातील आलेल्या वाईट अनुभवांचा पाढा वाचत असताना कुल यांना आपले अश्रू अनावर झाले. गट-तट बाजूला ठेवून सुनेत्रा वहिनी यांना मतदान करून त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावयाचे आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहन या वेळी कुल यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन