Tamannaah Bhatia | तमन्ना भाटिया अडचणीत! महाराष्ट्र सायबर सेलने पाठवले समन्स, आयपीएलशी संबंधित प्रकरण

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तनंतर आता दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाचे (Tamannaah Bhatia) नाव आयपीएल मॅच स्ट्रीमिंग प्रकरणात समोर आले आहे. याप्रकरणी ‘बाहुबली’ फेम अभिनेत्रीला महाराष्ट्र सायबर शाखेने चौकशीसाठी बोलावले आहे. महाराष्ट्र सायबर शाखेने अभिनेत्रीला समन्स पाठवले असून तिला २९ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणानंतर तमन्ना भाटिया अडचणीत सापडली आहे.

‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) २९ एप्रिल रोजी सायबर ब्रँचमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागेल, जिथे तिला प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगच्या संदर्भात महाराष्ट्र सायबरने तमन्नाला चौकशीसाठी बोलावले आहे.

अभिनेत्रीला २९ एप्रिलला प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत
न्यूज एजन्सी एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, ‘महाराष्ट्र सायबरने फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावले, ज्यामुळे वायाकॉमचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यांना २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ