Husband-wife relationship | पतीच्या या चुकांमुळे दररोज पत्नीसोबत होतात भांडणं, वेळीच सुधारा तुमची चूक!

पती-पत्नीचं नातं हे जगावेगळं (Husband-wife relationship) असतं. त्यांच्या नात्यात जितकं प्रेम असतं, तितकेच वादही होतात. ते म्हणतात ना, नात्यात कधी-कधी भांडणही व्हावी लागतात, तरच नात्यातील गोडवा टिकून राहतो. पण ही भांडणं काही वेळापुरती मर्यादित राहिली तरच ती गोड वाटतात. नाहीतर कधी एक छोटा वाद एक सुखी संसार मोडेल, कळत नाही. असे होऊ नये म्हणून तुम्हाला सर्वप्रथम पती आणि पत्नीमध्ये नेमके कोणत्या कारणांमुळे वाद होतात, हे समजून घ्यावे लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमच्या चुका सुधारू शकता.

नवंनवं लग्न झालेलं असतं तेव्हा पतीचं पत्नीवरील प्रेम (Husband-wife relationship) जरा जास्तच उतू जातं. अनेकांना ही सवय असते की ते लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात पत्नीला खूप सरप्राईज देतात, खूप भेटवस्तू देतात, पण नंतर ते सरप्राईज देणे बंद करतात. यामुळे महिलांना आपला नवरा बदललाय, त्याचं आपल्यावर आधीसारखं प्रेम राहिलेलं नाही, असं वाटू लागतं आणि हे अनेकदा भांडणाचं कारण बनतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, अधूनमधून का होईना पत्नीला छोटेसे तरी सरप्राईज देण्याचा प्रयत्न करा.

अनेकांना अशी सवय असते की ते पत्नीपेक्षा मित्रांना जास्त वेळ देऊ लागतात. अशा परिस्थितीत बायकोसोबत क्वालिटी टाइम न घालवणे हे पती-पत्नीमद्ये दुरावा वाढण्याचे कारण बनते आणि भांडणे वाढू लागतात. त्यामुळे मित्रांसोबत वेळ घालवताना बायकोसोबत क्वालिटी टाइम घालवायलाही विसरू नका.

बायको गृहिणी असेल तर कधी कधी असं होतं की अनेक दिवस घरात बसून तिला कंटाळा येतो. त्यामुळे तिची चिडचिड वाढते आणि मारामारी सुरू होते. त्यामुळे ऑफिसमधून वेळोवेळी सुट्टी घेऊन पत्नीला कुठेतरी फिरायला घेऊन जात जा, फार दूरची महागडी ट्रिप प्लॅन करणं शक्य नसेल तर तिला बाहेर जेवायला घेऊन जा, जवळच्या पार्कमध्ये नेऊन एकमेंकासोबत वेळ घालवा. जेणेकरून तिच्या मनाचे मनोरंजन होईल आणि चिडचिडही कमी होईल.

काही वेळा प्रणयाचा शेवट पती-पत्नीच्या भांडणाचे कारण बनतो. जबाबदाऱ्या वाढल्यामुळे, ऑफिस वर्कलोडमुळे किंवा इतर कारणांमुळे पती पत्नीला जास्त वेळ देऊ शकत नाहीत. पण नात्यात पूर्वीसारखं प्रेम नसेल तर ते दुरावतं. त्यामुळे प्रणयासाठीही वेळ काढा, जेणेकरून नात्यात प्रेमाचा गोडवा कायम राहील.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप