Sharad Pawar | विशाल अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवारांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले

Sharad Pawar | कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आला असून त्याच्या पित्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एकीकडे या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दुसरीकडे मात्र राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव ओढले जात होते. विशाल अग्रवालच्या (Vishal Agarwal) वकिलांशी शरद पवारांचे संबंध असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या आरोपांवर आता खुद्द शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले होते की, पुण्यात एक हिट अँड रनचे प्रकरण घडलय. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याबाबत कुठेही भाष्य करताना दिसत नाहीत. शिवाय, आरोपीच्या वकिलांशी तुमचे संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा. आता तुम्ही एखाद्या वकिलांचा संबंध तुम्ही याच्याशी जोडणार आहात. कोणीतरी चार ओळी छापल्या हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे, असं मला वाटतं नाही. प्रत्येक ठिकाणी मीच भाष्य केलं पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबतची जबाबदारी पाळली आहे. आता या प्रकरणाला वेगळं स्वरुप देण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप