माझ्या बोलण्याचा इतका त्रास होत असेल तर मी थांबतो – संजय राऊत

Mumbai – महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात राज्यकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील राजकीय उलाथापालथीला प्रचंड वेग आला आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रकरण कोर्टात असताना असं अधिवेशन बोलावणं असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. तसंच माझ्या बोलण्याचा जर इतका त्रास होत असेल तर मी थांबतो असंही आज संजय राऊत म्हणाले.

मी शिवसेनेचीच भूमिका मांडत असतो. माझ्या नेत्यांची भूमिका मांडतो आहे. महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी बोलतो आहे. याचा जर कुणाला त्रास होत असेल तर ठीक आहे मी बोलणं थांबवतो. आपण आधी मुंबईत या. पण मी बोलतोय आणि आदित्य ठाकरे बोलताहेत म्हणून येणार नाही हा बालिशपणा आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत. ते ठाकरे आहेत. त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. बंडखोरांनी आमच्या बोलण्याचं कारण देऊन अशी भूमिका घेणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.