Sanjay Nirupam | संजय निरुपम यांचा शिवसेनेत प्रवेश; म्हणाले, ‘बाळासाहेबांच्या विचारानुसार काम करताना काँग्रेसमध्ये अडचण येत होती’

Sanjay Nirupam | ठाणे टेभी नाका येथील आनंद आश्रममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत माजी खासदार संजय निरुपम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्याने काँग्रेस रिकामी झाली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला नक्की होईल. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

संजय निरुपम यावेळी म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारानुसार काम करताना काँग्रेसमध्ये अडचण येत होती. ती अडचण आता दूर झाली आहे. शिवसेनेला मजबूत करण्यासाठी पक्षात प्रवेश केला आहे. २० वर्षानंतर कुटुंबासह स्वगृही परत येत आहे. महायुतीच्या मुंबईतील सहा जागा निवडून येणार, असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय