Shivaji Adhalrao Patil : भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले, आढळराव पाटलांचे गौरवोद्गार

Shivaji Adhalrao Patil : शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. यावेळी भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त आयोजित कुस्तीचे थरार अनुभवले. प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकिनांनी आढळराव पाटील यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

यावेळी आढळरावांना कुस्तीप्रेमी नागरिकांशी संवाद साधताना म्हंटले की, भोसरी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बैलगाडा आणि दुसरीकडे कुस्ती आखाडा. महाराष्ट्राला अनेक दमदार कुस्तीपटू भोसरी गावाने दिले आहे. कुस्ती हा आपला ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे. मातीशी असलेली घट्ट नाळ भोजापुर नागरीने आजही टिकवून ठेवली आहे, याचा अभिमान आहे म्हणूनच भोसरीची यात्रा म्हणजे सर्व नागरिकांसाठी क्रीडा पर्वणीच असते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा